महाराष्ट्र सरकार माहिती जनसंपर्क संचलनालय वतीने चाणक्य कलामंच पथनाट्य तर्फे करोना संसर्गजन्य आजारावर जनजागृती अभयानास उत्साहात सुरवात

    89

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.24जानेवारी):-महाराष्ट्र राज्य शासन माहिती जनसंपर्क संचलनालय जिल्हा माहिती कार्यालय नाशिक व भारत सरकार युवक कार्यक्रम क्रीडा मञांलय अंतर्गत नेहरू युवा केन्द्रं संलग्न मैञेय सामाजिक उत्क्रांती बहूउद्देशीय सेवा संस्था नाशिक सचलित ङाॅ राजेश साळुंके यांच्या चाणक्य कलामंच पथनाट्य यांच्या सयुंक्त विद्यमाने करोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रोगापासून वाचविण्यासाठी जनजागृती अभियान संपुर्ण जगभरात पसरलेल्या रोगापासून वाचविण्यासाठी जनजागृती करत आहे.

    चाणक्य कलामंच पथनाट्य शासनाच्या विविध योजना बाबद प्रसिद्धी व प्रचार आणि प्रसार लोककला व पथनाट्यद्वारे जनजागृती दिनांक १९जानेवारी पासुन संपुर्ण नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रमुख बाजारपेठ, काॅलनी परिसर,शासकीय आश्रमशाळा ,बसस्थानकावर व विविध महत्त्वाच्या ठिकाणी करोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी ह्या आजारावर जनजागृती आपल्या पथनाट्यद्वारे नागरिकांना त्या वरील उपाययोजना करण्यासाठी माहिती दिली जात आहे करोना चा शिरकाव होऊ नये म्हणून मास्क वापरा सॅनिटायझर चा वापर करा.

    करोना संसर्गजन्य आजार म्हणजे काय तो कोठून आला त्या साठी आपण काय करावे याची संपूर्ण माहिती पथनाट्यद्वारे प्रबोधनातुन नागरिकांना मार्गदर्शन केले जात असुन नागरिकांनी चाणक्य कलामंच पथनाट्य यास भरभरून प्रतिसाद मिळत असुन चाणक्य कलामंच पथनाट्य कलाकार टिम ङाॅ राजेश साळुंके, संजय आव्हाङ, सतोष वाळवंटे ,साहील मोरिया,अजय वाघमारे, शुभम वाघमारे, मंगला आव्हाङ, सुचिता ताई साळुंके, साक्षी वाळवंटे, पूजा शिंदे आदी कलाकार जोमाने प्रबोधन पथनाट्यद्वारे जनजागृती करत असुन प्रत्येक तालुक्यात त्याचे उत्साहात स्वागत केले जात असुन नागरिकांचा भरघोस सहकार्य मिळत असल्या चे संचालक डॉ राजेश साळुंके यांनी स्पष्ट केले आहे