टोकरे कोळी युवा मंच महाराष्ट्र राज्यच्या वतीने युवती आणि महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केद्र स्थापन करण्यात आले

29

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.24जानेवारी):- दि.२३/०१/२०२१ रोजी मालपुर, ता.शिंदखेडा येथे युवती आणि महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले.श्री.वसंत बुधा कोळी सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी श्री.सुरेश कोळी, टोकरे कोळी युवा मंच चे संस्थापक/अध्यक्ष श्री. नितीन कोळी, संदिप कोळी, प्रशांत कोळी, मधुकर कोळी, हेमराज कोळी तसेच गावातील महिला आणि युवती उपस्थित होत्या.

श्री. वसंत बुधा कोळी यांनी जमलेल्या महिलांना प्रशिक्षणाचे महत्त्व सांगून स्वतः आत्मनिर्भर होऊन जीवन जगण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षणार्थी सौ. कविताताई कोळी यांनी सर्व गरजु आणि मेहनती महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा ध्यास असल्याचे सांगितले. श्री. नितिन कोळी यांनी जमलेल्या सर्वांचे आभार मानले आणि महिलांना पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.