सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडुन शिर्डी येथे खासदार मा सदाशिवराव लोखंडे यांच्या हस्ते धुळे येथील सौ.कविताताई कोळी महीला नारीरत्न पुरस्काराने सन्मानित

23

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.24जानेवारी):-दि.२२ जाने.येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.कविताताई कोळी यांना शिर्डी येथे सरपंच सेवासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने महीला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संरपच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयाेजीत “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान साेहळा २०२० शिर्डी येथे दि २२ जानेवारी राेजी आयोजित करण्यात आला होता.

शिर्डी लाेकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिवराव लाेखंडे,समाज प्रबाेधनकार मा.निवॄत्ती महाराज देशमुख ईदुंरीकर,माननिय राज्यमंत्री नगरविकास महाराष्ट्र राज्य प्राजक्त तनपुरे,संरपच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे साहेब,संरपच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,सघांचे राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते महीला नारीरत्न राज्य स्तरीय पुरस्काराने धुळे शहरातील सुप्रसिद्ध कार्यकर्त्या सौ.कविताताई कोळी यांना सन्मानित करण्यात आले.

सौ.कविता कोळी ह्या आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेशाध्यक्षा तसेच पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख आहेत.व मुलींना व विद्यार्थीनींना कुस्तीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांची अतुलनिय कामगिरी आहे. कविता ताई कोळी या स्वता उत्कृष्ट खेळाडू असुन शैक्षणिक, सामाजिक, क्रींडा क्षेत्रातील कार्याने त्यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे सौ.कविताताई कोळी यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.