महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांची बालगृहाला भेट

35

✒️अंबादास पवार(विषेश प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.24जानेवारी):-राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळ त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. बालगृहात मागे झालेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी प्रवेशित असलेल्या मुलांकडून महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी त्यांच्यासमावेत जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, माजी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प सदस्य जयश्रीताई शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. रामरामे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.