राष्ट्रीय मतदार दिवशी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

34

🔹एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.२४जानेवारी):- दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हा, तालुका, मतदान केंद्रस्तरावर
२५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. यंदा जिल्हास्तरीय “११ वा राष्ट्रीय मतदार दिवस” रुख्मिनी सभागृह एम.जी.एम. कॅम्पस , एन -६ सिडको , औरंगाबाद येथे दुपारी ४ वा. आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नागरिक, मतदार, दिव्यांग मतदार, नवमतदार व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय व मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती नोंदवितांना कोविड १९ परिस्थिती पाहता “मास्क व सॅनिटायझर”चा वापर अनिवार्य राहील, असेही ते म्हणाले.

जिल्हास्तरीय कार्यक्रमास औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, प्रमुख अतिथी पोलिस आयुक्त निखील गुप्ता,विशेष अतिथी कमांडर ब्रि.उपिन्दर सिंग आनंद, औरंगाबाद जिल्हयाच्या डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन कु.नवेली देशमुख यांची उपस्थिती असणार आहे.तसेच तालुकास्तरीय कार्यक्रम तहसील कार्यालयात व मतदान केंद्रस्तरीय कार्यक्रम संबंधित मतदाराच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी पार पडणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सांगितले आहे.