एम.आय.एम.चे. तालुका अध्यक्ष अजमतखान यांचे निधन

31

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.25जानेवारी):-येथील सामाजीक कार्यकर्ते तथा एम.आय.एम चे अहमदपूर तालुका अध्यक्ष अजमतखान अकबरखान पठाण यांना २३ जानेवारी रोजी हृदय विकाराचा झटका आला या मुळे त्यांना अहमदपूर येथुन लातुर येथील कवठाळे हाँस्पिटल येथे नेन्यात आले होते पण २४ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले असुन एक लढवय्या नेता अहमदपूरातुन काळाच्या पडद्या आड गेला असुन अजमतखान यांना चार भाऊ ,चार बहिन,पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

अजमतखान पठाण हे गाढे राजकीय अभ्यासक होते तसेच त्यांनी पत्रकारीता क्षेत्रातही आपला ठसा कायम ठेवला होता त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या कार्याला अहमदपूर कधीच विसरनार नाही.