महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री मार्तंडा खंडोबा(मल्हारी मलन्ना) यांचे अहेरी येथे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प

34

✒️संतोष संगीडवार(विशेष प्रतिनिधी)मो:-7972265275

अहेरी(दि.24जानेवारी):-इंडियन पॅलेस अहेरी येथे गानली समाज संघटना अहेरी च्या पुढाकाराने समाजाचे कुलदैवत तथा महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री मार्तंडा खंडोबा(मल्हारी मलन्ना) यांचे अहेरी येथे भव्यदिव्य मंदिर तसेच समाजभवन उभारण्याचे संकल्प घेऊन त्यावर महाचर्चा सत्राचे आयोजन केले. महाचर्चेच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गानली समाजाचे प्रतिष्ठीत सन्मानीय व्येकंटेशजी बी.बोम्मावार उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून गानली समाजाचे प्रेरित सन्मानीय अजयभाऊ कंकडालवार (जि.प.गडचिरोली अध्यक्ष) हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गानली समाज संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवासभाऊ गद्देवार यांनी उपस्थित होते. महाचर्चेच्या सत्रात अहेरी उपविभागातील संपूर्ण गानली समाज बांधव सहभागी झालेत आणि मंदिर निर्माण तथा समाजभवन उभारणीत सहकार्य करण्याचे ठरविले.

सदर कार्यक्रमाचे संचालन निखिल बोम्मावार, प्रस्ताविक श्रीकांत गद्देवार यांनी केले तसेच रविंद्र बोम्मावार, लक्ष्मण गद्देवार, जुगल बोमनवार, अमित येणप्रेड्डीवार, पद्मा येनगंटीवार यांनी समाजाबद्दल मोलाचे मार्गदर्शनपर भाषण केले व समाजाचे हे कार्य सर्वांनी एकत्र येऊन या कार्याला समोर नेण्याबाबतचे आपल्या मनोगतात व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन महेश गद्देवार यांनी केले. तसेच कार्य यशस्वीतेसाठी नरेश बोम्मावार, निलेश पुपरेड्डीवार, अमित नागुलवार, दिनेश येनगंटीवार, मलरेड्डी ओडेट्टीवार,पराग आईलवार, नितिन बंडमवार, सचिन नागुलवार, आकाश बोमनवार, नरेंद्र बोम्मावार, वैभव कंकडालवार, प्रवीण आईलवार, अविनाश बोमनवार, संतोष येनगंटीवार, मलरेड्डी बोमनवार, फ्रफुल येनगंटीवार, मुकेश पुपरेड्डीवार, तिरुपती सल्लावार, साई येनगंटीवार, राजु तोटावार, अक्षीत पोरेड्डीवार, प्रमोद गोडशेलवार, तसेच समाजबांधवांनी महाचर्चा यशस्वी केले.