कलापथकाव्दारे जिल्ह्यात जनजागृती; पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्याहस्ते शुभारंभ

29

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.२६जानेवारी):-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 180 गावात कलापथकाव्दारे कोविड जनजागृती तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलींद दुसाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार आदी अधिकारी उपस्थित होते.

कोविड जनजागृती तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती सर्वसामान्य नागरिकापर्यंत कलापथकाव्दारे पोहचविण्याकरीता जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये प्रसार व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील निवडक 25 गावामध्ये तसेच अकोला शहरात पाच ठिकाणी असे कलापथकाचे 180 कार्यक्रम करण्यात येणार आहे.