श्रीनाथ म्हस्कोबा शुगर पुणे येथे साखर विश्व प्रतिष्ठानचा सन्मान प्रदान

29

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.26जानेवारी):-26 जानेवारी प्रजाकसत्ताक दिना निमित्य श्रीनाथ म्हस्कोबा शुगर पाटेठान पुणे येथे साखर विश्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात आलेला सन्मानपत्र, 5000 रु चा धनादेश व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखानाच्या वतीने 5000 रुपये रोख वाढवून करत कामगाराचे मुलाचे कौतुक केले आहे.

कुमार वैभव चातुरसेन गायकवाड यांनी दहावी बोर्ड परीक्षेत 90 टक्के मार्कस मिळवलेबद्दल साखर विश्व प्रतिष्ठान च्या वतीने 5000/- चा धनादेश व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना यांचे वतीने 5000/- रोख मा. चेअरमन सो पांडुरंग राऊत सो यांचे हस्ते देण्यात आले या प्रसंगी भविष्यात असे उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात कारखान्याच्या व साखर विश्व प्रतिष्ठान च्यावतीने राबविले जातील असे मा चेअरमन सो यांनी सांगितले या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन जनरल मॅनेजर मते साहेब चीफ इंजिनिअर क्षिरसागर सो. प्रोडेक्शन मॅनेजर यादव सो व असंख्य साखर कामगार उपस्थित होते.