भारतताची प्रजासत्ताक नव्हे तर प्रजेवर सत्तेकडे वाटचाल- रामचंद्र सालेकर,(राज्यउपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पं.दे.शिक्षक परिषद)

30

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.27जानेवारी):-७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख चे मुख्याध्यापक तथा शिक्षणमहर्षी डाॕ.पं.दे.शिक्षक परिषद राज्यउपाध्यक्ष रामचंद्र सालेकर यांनी देशाची विदारक सद्य स्थिती बघता या देशात प्रजासत्ताक नसून प्रजेवर सत्ता बळकावलेला देश बणला असल्याची खंत व्यक्त केली.

देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती,भ्रष्टाचार बेरोजगार महागाईच्या भस्मासुरात होरपडत असलेलं जनजीवन,धर्माच्या नावावर मानसा मानसात पेरल्या जात असलेले जहर,विकासापेक्षा विकासाला मारक भावणिक बाबीचे उदात्तीकरण करुन प्रजेच्या मुलभूत गरजा,शिक्षण व प्रगतीची बंद होत चाललेली दारे, विकास कामाऐवजी प्रजेचे शोषण होणाऱ्या धार्मीक बाबीवर जनतेच्या पैशाची धुळधानी,प्रजेच्या जल जंगल जमीनीवरील अधिकार हिरावून घेण्यासाठी तयार करण्यात येणारे संविधान विरोधी काळे कायदे,सरकारी मालकीच्या मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घालणारे धोरण, राजकीय क्षेत्रातील ठासळलेली नितीमत्ता, समाजात जात धर्माच्या नावावर फुट पाडून करण्यात येत असलेले धृविकरण, राजकीय स्वार्थासाठी ‘तोडा फोडा व राज्य करा’ ही राज्यकर्त्यांची निती…

अशा गंभीर परिस्थितीत देश असून गरीबी श्रीमंतीची वाढलेली दरी लक्षात घेता देश परत गुलामगीरीच्या गडत छायेत असल्याचे स्पष्ट जानवत असून,प्रजेने देव धर्म जात पंत पक्ष या मनुवाद्यांच्या जंजीरातून बाहेर पडून आपल्या प्रगतीचा मार्ग अनुसरावा व प्रजेवर सत्ता निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडून खरे प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करावे. प्रत्येकांनी आपले कुटुंब आनंदी सुखी समाधानी कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा व आपल्या गावाचा विकास साधावा असे आव्हाण केले.

याप्रसंगी प्रकाश रामटेके अध्यक्ष व सौ. संध्या डफ उपाध्यक्षा शा.व्य.स. वाघनख यांनी म.गांधी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांचे पुजन करुन अध्यक्ष प्रकाश रामटेके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व शालेय व्यवस्थापण समिती सदस्य,अंगणवाडी कर्मचारी, नवनिर्वाचित ग्राम पंचायत समीती सदस्य,आरोग्य कर्मचारी तथा गावातील गण्यमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत कोविड 19 च्या सर्व निर्देशांचे पालन करुन जि.प.उ.प्राथ शाळा वाघनख येथे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर,विषय शिक्षक धनराज रेवतकर,स.शिक्षक संतोष धोटे,स.शिक्षिका कु.वैशाली गायकवाड यांचे नियोजनाता संपन्न झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विषय शिक्षक धनराज रेवतकर यांनी केले तर आभार स.शिक्षिका सौ.रेखा थुटे यांनी मानले.
————