नाभिक युवा आघाडीतर्फे हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.27 जानेवारी):- नाभिक युवा आघाडी व नाभिक महिला आघाडी ब्रह्मपुरी तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम , रक्तदान शिबिर, जिवाजी महाले व वीर भाई कोतवाल यांच्या जयंतीचा कार्यक्रम तसेच स्नेहमिलन कार्यक्रम नुकताच संत नगाजी महाराज देवस्थान कहाली रोड ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साहाने पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ रिताताई दीपक उराडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून .सौ अर्चनाताई खंडातेन.से.ब्रम्हपुरी,सौ अंजलीताई उरकुडे न.से ब्रम्हपुरी,सौ लताताई संजयजी ठाकूर न. से. ब्रम्हपुरी ,सौ .सुनीताताई खेमराज तिडके न.से.ब्रम्हपुरी , सौ. सरिता ताई माधवजी पारधी न.से.ब्रम्हपुरी,सौ निलिमाताई सावरकर न.से.ब्रम्हपुरी , सौ वनिताताई अलंगदेवें न.से. रूपालीताई रावेकर.न.से.ब्रम्हपुरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि जीवा महाले, भाई कोतवाल,संत नगाजी महाराज ,संत सेना महाराज ,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. स्त्री सर्व शोधांची जननी आहे त्यामुळे स्वतःला अबला न समजता स्वतःची ओळख निर्माण करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा व आत्मनिर्भर व्हावे तसेच आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करावे संतांचे चरित्र ,वाङ्मयाचे वाचन करावे व ज्ञान प्राप्त करून सुखाचा संसार करावा असे प्रतिपादन आपल्या मुख्य मार्गदर्शनात ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ अर्चना ताई खंडाते यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ रिताताई उराडे यांनी नगरपरिषदेच्या विविध योजना सांगून महिलांचे सक्षमीकरण कसे करता येईल याबद्दल प्रबोधन केले कार्यक्रमामध्ये नाभिक समाजातील सौ ज्योती ताई सचिन मेश्राम यांची नुकतीच ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना ज्योतीताई मेश्राम म्हणाल्या की नाभिक समाजातील महिलांनी स्वतःला कमी न समजता राजकारणात प्रवेश करून आपल्या समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करावे . पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला समाजातील सर्व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सौ पगाडे ताई यांनी केले तर प्रास्ताविक सौ रजनी सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन पितांबरजी फुलबांधे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाणे झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसेच समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.