माहिती अधिकार अधींनियमात गंगाखेड नगर परिषदेने माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने सुनावला 5 हजार रुपये दंड

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28जानेवारी):- गंगाखेड नगर परिषद अपंग विभागात अपांगाच्या अनुदाना बाबत माहिती अधिकार अधिनियम सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने यांनी माहिती अधिकार अर्ज केल्यावर जनमाहिती अधिकारी श्री तातोडे यांनी तीस दिवसात कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी निकाल देत 5000 रु. च दंड तातोडे यांना ठोठावला आहे.संबधित आदेशात राज्य माहिती आयोगाने जनमाहिती अधिकारी यांना सुनावणीचे पत्र ही दिले असता जनमाहिती अधिकारी यांनी नोटीशीवर कोणताही खुलासा सादर केला नाही.

त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 20 (1) नुसार संबधित जनमाहिती अधिकारी शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे अधिंनियमातील कलम 19(8) ( c ) अन्वये राज्य माहिती खंडपीठ यांनी 5000/- रुपयाची शास्ती लावत असल्याचे निर्णयान्वये कळविले आहे. माहिती विषयी वस्तुस्थिति उपलब्ध न करून देण्यास जबाबदार जनमाहिती अधिकारी यांची दंडाची वसूल करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी कलम 19(8)(क ) व 19(7) अन्वये निश्चित करण्यात येत आहे.या बरोबरच संबधित विभागाने पैशाची अफरा तफर करत अपंग योजना मधून स्वत:च्या नावे सुद्धा अनुदान घेतले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने यांनी बोलतांना संगितले.