कुंडलवाडीत विविध ठीकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

34

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.28जानेवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी
शहरात विविध ठीकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.नगरपालीकेत नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते ध्वजवंदना करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड,जि.प.हायस्कुल मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक देविदास निरडवार,ऊर्दू विद्यालयात मुख्याध्यापक माजीद नांदेडकर,कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव लक्ष्मण सोमशेटे,कै.गंगाबाई सब्बनवार विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव सब्बनवार,मिलींद विद्यालयात मुख्याध्यापक यु.एस.राठोड,के.रामलु पब्लिक शाळेत संस्थापक सायरेड्डी ठकुरवार,पोलिस ठाण्यात सपोनी मान्टे,विविध विकास सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन साईनाथ उत्तरवार यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.

यावेळी,व्हाईस चेअरमन काशिनाथ नरावाड,मँनेजर रामराव रत्नागिरे,भुमन्ना ठकुरवाड,हनमनलु गोनेलवार,उत्तम पा.देगावे,पोशेट्टी इजमवार,रमेश भोरे,संजय रामपूरे,गोविंद शेनपूंजे,किशन लाड,लक्ष्मण होरके,शांताबाई मामीडवार,शकुंतलाबाई तिपने,मिनाक्षी लाडे,गंगाधर मावंदीकर,मोहन मादाळे,बालाजी इंदूरकर,बालाजी पोटपेलीवार आदी उपस्थित होते.