सिद्धार्थनगर येथे भारतीय बौद्ध महासभेची महिला शाखा गठित

    36

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

    दिग्रस(दि.29जानेवारी):- येथील सिद्धार्थनगर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा दिग्रस यांच्या अंतर्गत सिद्धार्थनगर येथे महिला शाखा गठित करण्यात आली.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक देवतळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका सरचिटणीस एकनाथ मोगले , उपाध्यक्ष यशवंत भरणे,महादेव धुळध्वज ,तुकाराम उबाळे , चिंतामण मनवर , खुशाल मनोहर , किसनराव हस्ते,रमेश वहिले , देविदास खंदारे , गायक पुरुषोत्तम मेश्राम, उत्तम इंगोले ,पुष्पा धुळध्वज, सुनिता मनवर ,ज्योती वहिले इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थिती होते.

    सिद्धार्थनगर शाखेच्या महिला अध्यक्ष पदी सारिका शेखर गावंडे यांची निवड करण्यात आली .तर कोषाध्यक्ष पदी अंजली पंजाब वानखेडे आणिसरचिटणीस पदी मीनाताई सुरज कांबळे यांची निवड करण्यात आली. व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम उबाळे यांनी केले. तर आभार यशवंत भरणे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी उपासक – उपासिका यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.