पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमूले व कार्याध्यक्षपदी नवनाथ पौळ तर सचिवपदी घाडगे रणजीत यांची सर्वानूमते निवड

28

🔸बीड जिल्हा कार्यकारणीत राजकूमार धिवार यांची निवड होणार

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.30जानेवारी):- जिल्हातील केज तालूकाची पुरोगामी पञकार संंघा’ची नवनिर्वाचीत कार्यकारणी पुरोगामी पञकार संघा’चे राज्य-संघटक श्री, भागवत वैद्य मराठवाडा-सचिव स. का. पाटेकर तसेच बीड जिल्हा-उपाध्यक्ष , ब्रम्हनाथ कांबळे यांच्याकडून केज तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली .या बैठकीचे अध्यक्ष राजकूमार धिवार यांनी पुढील कार्यकारणीकरिता अनुमोदक दिले. तर याकरिता माजी शहर-अध्यक्ष रणजीत घाडगे यांनी ठराव मांडला असेकी, पुरोगामी-पञकार-संघाची 01 जानेवारी-2020 ते 31- डिसेंबर-2020 जुनी कार्यकारणी बरखास्त करुन 01 जानेवारी-2021 ते 31 डिसेंबर-2021 च्या नवीन कार्यकारणी करण्यासाठी रितसर परवानगी मांडली.

सदरिल पुरोगामी पत्रकार संघा’चे संस्थापक-अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानूसार संपुर्ण राज्यात या 01 जानेवारी-2021 सर्व विभागिय कार्यकारणी , जिल्हा-कार्यकारणी , तसेच तालूका-कार्यकारणीची पुनर्गठित करण्यासाठी सुरु केलेले आहे. आज बीड जिल्हाच्या शाखा केज तालूकाची बैठक पार पडली याबैठकीत तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय मुजमूले तर सचिव पदी घाडगे रणजीत तर शहराध्यक्ष पदी अनिल वैरागे व कार्याध्यक्षपदी नवनाथ पौळ यांची या बैठकीत नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

तर पुढीलप्रमाणे शाखा केज तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, उपाध्यक्ष अतिनंद कांबळे, उपाध्यक्ष पदी हनुमंत गव्हाणे,सदस्य पदी अजय भांगे, आमोल सावंत यांची निवड करण्यात आली असून सर्वांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या बैठकीचे प्रमुख पाहूणे पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक भागवत वैद्य, मराठवाडा सचिव स.का पाटेकर,जिल्हा-उपाध्यक्ष ब्रम्हनाथ कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, नंदा वाघमारे,मंदाकिनी पायाळ, स्नेहल पायाळ,राजकुमार धिवर उपस्थित होते.