गायरानधारकांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी झाली आक्रमक

29

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.30जानेवारी):- 29 जानेवारी रोजी केज तालुक्यातील भूमिहीन कसत असलेल्या गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात. लाडेगाव ता केज येथील भूमिहीन यांनी अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेल्या पिकांची शासनाने केलेली नासधूस. याची चौकशी करण्यात या मागणीसाठी केजमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे व तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील भूमिहीन कसत असलेल्या गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात.गायरान जमिनी कसत असलेल्या जमिनीवरील पिकांचे पंचनामे करून एक-ई नोंदी घेण्यात याव्यात.

गायरान जमिनी वाटपाचा 2015 पर्यंत मुदतवाढ करूण नवीन जिआर काढण्यात यावा. लाडेगाव ता केज येथील भूमिहीन यांनी अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेल्या पिकांची शासनाने केलेली नासधूस. याची चौकशी करण्यात यावी.केज तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये नरेगा अंतर्गत वृक्षारोपण व १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर
मागणीसाठी दि. २९ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

त्या नंतर जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे, उ.का.स.जिल्हाध्यक्ष राणबा उजगरे, सुनिल गायसमुद्रे, भगवंत आप्पा वायबसे, देविदास बचुटे सर, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, धनराज सोनवणे, बाबा मस्के, गौरी शिंदे, अजय भांगे, उत्तम वाघमारे, नवनाथ पौळ, विशाल भैय्या धिरे,मधुकर गायकवाड, अभिमान गायकवाड, दिपक धिरे,संजय सोनवणे, आकाश आदमाणे, तानाजी पौळ, श्रीमंत गायकवाड,यांच्यासह तहसील कार्यालयावर जाऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. या आंदोलनात लाडेगाव, कौडगाव ,कानडी माळी, कानडी बदन,केकतसारणी,आवसगांव,बनसारोळा,बोरीसावरगांव,आणि केज तालुक्यातील अनेक गावातील गायराणधारक मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते.