कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख (5000000) रुपये सानुग्रह सहाय्य मंजूर

  42

  ?विकास धाइंजे व वैभव गिते या जोडीची अफलातून कामगिरी

  ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

  अहमदपूर(दि.31जानेवारी):-मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय करमाळा यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै.अन्सार शौकत सय्यद यांचा covid-19 संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने दिनांक 18/7/2020 रोजी मृत्यू झाला होता. विभागीय आयुक्त पुणे यांनी कै.अन्सार शौकत सय्यद मंडळ अधिकारी यांच्या कुटुंबीयांना वित्त विभागाच्या शासन निर्णय 29/5 2020 नुसार 50 लाख इतके सानुग्रह सहाय्य मंजुरीचा प्रस्ताव शासनास पाठवला होता. कै.अन्सार शौकत सय्यद हे covid-19 च्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने “प्रतिबंध” सध्याचे कर्तव्य बजावत होते. आणि ते रूग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या तारखेपूर्वी 14 दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर होते असे जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी प्रमाणित केले आहे.

  तसेच मंडळ अधिकारी कर्मचार्‍याचा मृत्यू हा covid-19 या रोगाची संबंधित आहे असे संबंधित सरकारी महानगरपालिका,प्राधिकृत खाजगी रुग्णालय,प्रयोगशाळा यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय करमाळा यांच्या आस्थापनेवर कार्यरत कर्मचारी कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबियांना 50 लाख इतकी रक्कम सानुग्रह सहाय्यक म्हणून प्रदान करण्यास महसूल व वनविभागाच्या दिनांक 29 जानेवारी 2021 याद्वारे मंजुरी आहे.

  नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मॅन्युअल स्कॅवेंजिंग ऍक्ट कमिटी सोलापूर सदस्य वैभव तानाजी गिते व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे व इतर संबंधित विभागांकडे covid-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना covid-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यास 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण देऊन कुटुंबीयांना सानूग्रह सहाय्य म्हणून 50 लाख रुपये देण्याची निवेदनाद्वारे मागणी करून मंत्रालयीन पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

  राज्यात कोरोना covid-19 या विषाणूच्या संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे शिलेदार अभ्यासू मा. विकासदादा धाईंजे व वैभव गिते या जोडीने प्रामाणिक कर्तव्य बजावून हा निधी मंजूर करून आणला असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात चालू आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 29 जानेवारी 2021 रोजीच्या शासननिर्णयानुसार कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मंजूर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्राप्त झाले आहेत.