निंबा शाळेतील विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम

    40

    ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गोंदिया(दि.31जानेवारी):-गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथील विद्यार्थी लीलाधर राजेंद्र बहेकार वर्ग 7 वा याने निबंध लेखन स्पर्धेत गोंदिया जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.कोरोणा काळात जनजागृती करण्यासाठी शासनाने विविध स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.15सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020या काळात शालेय विद्यार्थी व शिक्षकांचे विवीध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यातून “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या विषयावर आधारित निबंध स्पर्धेत सदर विद्यार्थ्याने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.

    असुन त्याचे सत्कार मा.अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र शासन व पालकमंत्री गोंदिया यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आर. एच. नंदेश्वर, मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र बनसोड, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री माधव शिवणकर तसेच माता पालक संघाचे अध्यक्ष तेजश्वरी ठाकरे आणि सदस्य, मोहगाव केंद्रांचे केंद्र प्रमुख अगडे सर, गावकरी मंडळी नी अभिनंदन केले आहे
    या यशाबद्दल विद्यार्थी व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे