राष्ट्रपती पदकाचे मानकरी पो.नि.धबडगे यांचा बिलोली पञकार संघाच्या वतिने जंगी स्वागत

32

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलुर(दि.31जानेवारी):-देशातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ठ सेवाकार्याची दखल घेऊन दरवर्षी प्रमाणे दिल्या जाणारे राष्ट्रपती पोलीस पदकाचे यंदाचे मानकरी ठरलेले देगलुर पोलीस ठाण्याचे गुणवता पुर्ण कर्तबगार कार्यरत पो.नि.भगवान म.धबडगे याना नुकतच जाहिर झाला आसुन त्यांचा दि.२९ जानेवारी रोजी बिलोली तालुका म.रा.मराठी पञकार संघाच्या वतिने देगलुर येथे जंगी आसे स्वागत करण्यात आले

बिलोली पोलीस ठाण्यात गेली आडीच वर्षे सेवा कार्यकाळात पोलीस निरीक्षक पदार आपली सेवा कर्तव्य बजावत आसताना खाकी वर्दीतील कार्याला जोपासत या पलीकडे ही जाउन गोरगरीबांच्या आडी आडचणीसह विविध सामाजिक क्षेञात देखिल त्याचे सततचे आसलेले मौलाच योगदान पहाता आशा या कर्तबगार पोलीस अधिका-यांची उल्लेखनीय आणी गुणवतापुर्ण सेवेची योग्य ती दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी नुकतीच निवड घोषीत करण्यात आली.सदर निवडीचे विविध क्षेञातील मान्यवरांकडुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या जाहीर पाञ सत्कारमुर्तीचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ बिलोलीच्या वतिने आज दि.२९ जानेवारी शुक्रवार रोजी उपविभागिय पोलीस कार्यालय देगलुर येथे शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन जंगी आसा सत्कार करण्यात आला. तसेच येथे नव्याने रुजु झालेले उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन सांगळे याचा ही सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाअध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेट्टीवार, बाबुराव इंगळे,दिलीप पांढरे प्रा.मोसिनखान, भिमराव बडुरकर , सतिश बळवंतकर ,बसवंत मुंडकर ,मार्तंड जेठे ,प्रल्हाद पाटील,पि. आर वानोळे ,हाणमंत पांढरे ,जावेद अहमद,शेख आसलम यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.