देशासाठी महात्मा गांधींचे योगदान अमूल्य- श्यामभाऊ उमाळकर

    50

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    मेहकर(दि.30जानेवारी):- भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अहिंसेची कास धरत त्यांनी सहकाराच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी लोकांना कायम प्रवृत्त केलं. देशासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे अशा भावना व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य श्यामभाऊ उमाळकर यांनी मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य मैदान मेहकर येथे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली.

    यावेळी प्रामुख्याने मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कलीम खान, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाने, प्रदेश सेवादलाचे सरचिटणीस शैलेश बावस्कर, माजी नगरसेवक संजय म्हस्के, एम एस यु आय चे प्रदेश सचिव वसीम कुरेशी उपस्थित होते.

    याप्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष युनुस पटेल, शहर उपाध्यक्ष अॅड गोपाल पाखरे, अॅड सि वाय जाधव, आशिष बापू देशमुख, रियाज कुरेशी, नारायण पचेरवाल, अॅड नितीन जाधव, मुनाफ खान, छोटू गवली, सुखदेव ढाकरके, संदिप ढोरे, सुरज मिरे, भीमराव गवई, शाहू गवली, साहील कुरेशी, भरत पिटकर सुमित देबाजे, शुभम इंगळे, निलेश माने, अविनाश पिटकर, साहेबराव जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थितांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पमाला व पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.