मास्टर माईंड कोण ?

32

भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतांना भारतीय किसान आंदोलनानी जो ऐतिहासिक लढा दोन महिण्यापासून दिला तो अभुतपूर्व व क्रांतिकारक आहे.या आंदोलनात अनेक किसान शहिद झाले.हे आंदोलन भारतीय लोकशाहीला नव्या परिवर्तनवादी विचारगर्भशीलतेचा आयाम देणारे ठरत असतांना भारतीय प्रजासत्ताक दिनी जो प्रकार दिल्लीला घडला तो अत्यंत निंदनिय असा आहे.खरा किसान काळ्या आईसाठी रक्त आठवतो.आपल्या श्रमातून हिरवं सोनं पिकवतो.साऱ्या भारताला अन्न धान्य पुरवतो.परंतु आज हाच किसान स्वतःच्या अस्तित्वासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करतो.नवीन कृषी कायद्याविरूध्द एल्गार पुकारतो.पण वर्तमान केंद्र सरकार चर्चेत गाफिल ठेवून किसान आंदोलनाचा अंत पाहतो.किसानाला वेठीस धरून त्याच्या मागण्याला केराची टोपली दाखवतो.ही अत्यंत निराश करणारी कृती होत असतांना प्रजासत्ताक दिवसी किसानाला ट्रँक्टर परेडला पोलिस परवानगी देतो.हे न समजणारं कोडं आहे.या परेड मधील काही अराजक तत्वाने जो मार्ग तय केला त्याचे उल्लंगण केलं आणि आंदोलनाला गालबोट लागली.

कोणतेही आंदोलन म्हटले तर तिथे एक रणनीती असते.आंदोलन सनदशीर मार्गानेच चालावे अशी आशा आंदोलन नेतृत्वाला असते .पण कधीकधी या आंदोलनात काही दुसऱ्या विचाराची माणसे शिरतात व आंदोलनाला दिशाहीन करतात.हाच प्रकार दिल्लीला घडला.

दिल्ली हे भारताचे हृदय आहे.किसानानी आपले आंदोलन राज्यामध्ये केले पण वर्तमान केंद्र सरकारने त्यांचा आंदोलनाला समजून घेतले नाही.जेव्हा किसान दिल्लीच्या बार्डरवर आले तेव्हा सरकारला जाग आली.हे आंदोलन फक्त काही भागापर्यंत न राहता ते भारतातील सर्व राज्यात पसरले.सरकार सोबत अनेक वार्ता होऊनही काहीही फायदा झाला नाही.म्हणून किसानानी प्रजासत्ताक दिनाला आपली ताकत दाखविण्यासाठी ट्रँक्टर परेड काढली.पण जो रूट दिला होता तो रूट काही अराजरतत्वांनी बदलला व किसान आंदोलनीचा उद्रेक झाला.हा उद्रेक मास्टरमाईडचा नियोजीत डाव होता असे कृतीवरून लक्षात येते.या आंदोलनाला समजण्यास गुप्तचर यंत्रणा व गृहखाते सपशेल फेल ठरले असे मनावे लागेल.

जेव्हा देश आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत असतांना भारतीय किसान आपले दुःख जगाच्या वेशीवर मांडत होता.सरकारचे कृषी कायदे कसे चूकिचे आहेत हे सांगत होता.पण वर्तमान असंवेदनशील सरकार आंधळं होऊन स्वतःची पाठ स्वतःच थोपटत होतं.
भारतीय इतिहासातील अत्यंत निंदनिय अशी घटना घडली हे केंद्र सरकारचे अपयश आहे.केंद्र सरकारने योग्य प्रकारे आंदोलन हाताळले असते तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाचा उद्रेक शमवता आला असता.
ह्या घटनेचा कार्यकारणभाव लक्षात घेता असे निर्देशित होते की,या घटनेमागे कोणीतरी मास्टरमाईड आहे.अशाच प्रकारच्या घटना दिल्लीत व इतरही भागात घडलेल्या आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे.किसानाला बदनाम करून त्याचे आंदोलन थांबवने किंवा मोडून काढणे हे काम सामान्य लोकांचे नसते तर मास्टरमाईडचा गेमपँलनच आहे.भारतातील महत्वाच्या दिवसाला जाणुनबूजुन टाँरगेट करणे काही संघटनाचे षडयंत्र असते .६ डिसेंबरला म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनाला बाबरी मशीद पाडली जाणे,२६ नोव्हेंबर संविधान दिनाला मुंबईवर अतिरेकी हल्ला होणे,२६ जानेवारीला लाल किल्यावर उद्रेक घडवून आणने या घटना मध्ये समांतरता दिसून येते.मास्टरमाईंडची छुपी विकृती आपण समजून घेतली पाहिजे.

दिल्ली हे भारताच्या श्वासाचे शहर.या शहराने काही वर्षापासून अनेक दंगली पाहल्या पण वर्तमान सरकारच्या काळात दिल्लीला घडणाऱ्या दंगलीत भारतीय एकात्मतेवर प्रहार होतांना दिसतात.धार्मिकतेच्या उन्मादाचा विषारी रसायनयुक्त मेंदू तयार करून आपली पोळी शेकण्याचा रंडी डाव खेळला जात आहे.हा डाव भारतीयाने हाणून पाडावा.प्रजासत्ताकात प्रजेची सत्ता असते.नेत्याची नाही हे दाखविण्यासाठी किसान आंदोलनाला साऱ्या भारतीयांनी समजून घ्यावे.देशातील लोकशाहीला जपणे हेच आपले परम कर्तव्य आहे.या घटनेमागील मास्टरमाईडला शोधून काढून देशासमोर नंगा करणे हीच आपली रणनीती असावी.येणाऱ्या तरूणाईच्या पंखाना बळ मिळावे.धार्मिकतेची अफू चारणाऱ्या महाभागापासून देशाच्या तरूणांनी सावध व्हावं.देशाला अखंडीत करणाऱ्या अमाणुषतेवर शब्दशस्त्रे पाजवून प्रहार करावा.

भारतीय ७२ वा प्रजासत्ताक दिनाचा तिरंगा मोठ्या डौलाने लाल किल्यावर फडकत होता.तिरंग्याला कोणीही किसान स्पर्श करू शकला नाही.तिथे आलेले सारेच किसान आपला आवाज बुलंद करण्यासाठी जमा झाले होते.पण काही अराजकतत्वांनी जो धुमाकूळ घातला तो अत्यंत बेजबाबदारपणाचा होता.हाच प्रकार जर शांततेने झाला असता तर किसान आंदोलनाला बदनाम करता आले नसते.किसान आंदोलनाला चिरडण्यासाठी हा केलेला कपोलकल्पित डावाचा मास्टरमाईड अत्यंत धृर्त व कावेबाज आहे.त्याचा मेंदू फक्त दंगलीसाठीच तयार झाला आहे हे आपण आेळखले पाहिजे.

किसान या देशाचा भूमीपूत्र आहे.तो ना खलिस्थानी आहे,ना विदेशी आहे.तो खरा भारतीय देशभक्त आहे.आपल्या रक्तातून सर्व नागरिकांना अन्न देणारा पोषिंदा आहे.किसान आंदोलनाला चिरडण्यासाठी जो डाव मास्टरमाईडने टाकला तो डा त्याच्यावर उलटला आहे.पुढील २०२४ ला अशा गेमपँलनर किसानाचा नांगर चालवल्या शिवाय भारताला तरणोपाय नाही. भारतीय प्रजासत्ताक दिनाला गालबोट लावणारा मास्टरमाईड कोण ..? याचा छडा लावणं हेच खऱ्या भारतीयाचं ध्येय असायला हवं.तृर्तास थांबतो.

✒️प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००