नेर जि.प.सदस्या सौ.मनिषा खलाणे यांच्या पाठपुराव्याला यश नेर जि.प.गटात १ कोटी ५ लाखाचे रस्ते मंजुर

29

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.1फेब्रुवारी):-तालुक्यातील नेर जिल्हा परिषद गटातील गावाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले होते या रस्त्यावर शेतकर्याना तसेच ग्रामस्थांना बैलगाडी व वाहनाने शेतमालाची किवा वापर करतांना मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसराल शेतकर्यानी ही समस्या सौ खलाणे यांच्या कडे मांडली होती रस्ता दुरुस्तीसाठी हा शेतकर्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने तितकाच महत्वाचा असल्याने सौ खलाणे यांनी वारंवार जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे या रस्त्यासंबधी मागणी केलेली होती त्या अनुषगांने नेर गटातील गावांमध्ये 7 रस्ते १५ लक्ष याप्रमाणे खडीकरण व डांबरीकरण साठी सदर निधी ३०/५४ या लेखाशिर्ष मधुन मंजुर करण्यात आला असुन सदर निधी खाली रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे.

१) नेर येथील यशवंतराव महाराज ते खंडलाय खुर्द कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १५ लक्ष
२) खंडलाय खुर्द ते अमरधामकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे १५ लक्ष
३) जुने भदाणे ते देऊर कडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे १५ लक्ष
४) अकलाड ते बोधा कडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे १५ लक्ष
५) शिरधाने ते चिचवारकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे १५ लक्ष
६) अकलाड ते नेरकडे जाणारा दुरुस्त करणे १५ लक्ष
७) महामार्ग ते नांद्रे कडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे १५ लक्ष असे नेर गटातील ७ रस्ते दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लक्ष निधी मंजुर करण्यात आला आहे .आपल्या जि.प.क्षेत्रातील प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजनांमार्फत निधी आणुन अनेक विकासकामे सौ.खलाणे हे कमी काळात पुर्णत्वास नेत अपेक्षापुर्ती करीत असल्याने जागरुक  व विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणुन परिसरात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

यासाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डाॅ सुभाष भामरे,माजी मंत्री जयकुमार रावल,माजी मंत्री अमरिषभाई पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष डाॅ तुषार रंधे,उपाध्यक्ष व बांधकाम सभापती कुसुमताई निकम,कृषी सभापती रामकृष्ण खलाणे,महिला व बालकल्याण सभापती धरतीताई देवरे,शिक्षण सभापती मंगलाताई पाटील,जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव यांचे सहकार्य मिळाले आहे.