अपर जिल्हाधिकारी कार्यालय चिमुर अंतर्गत समाविष्ठ गावांबाबत आक्षेप आमंत्रित

    36

    ✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

    चंद्रपूर(दि.2फेब्रुवारी):- 2, महसूल व वनविभागाच्या दि. 11 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमुर ला शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालय चिमुर मध्ये जिल्ह्यातील चिमुर, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला असून याअंतर्गत 19 महसुल मंडळे, 113 तलाठी साझे व 652 गावांचा समावेश आहे.

    अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमुर मध्ये सदर गावे समाविष्ठ करण्याबाबत कोणास काही आक्षेप असल्यास 15 दिवसाच्या आत संबंधीत उपविभागीय कार्यालयात आक्षेप दाखल करण्यात यावे, तद्नंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाचा विचार केल्या जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.