हणेगाव येथे राम मंदिर निर्माण निधी अभियान

    41

    ✒️देगलूर प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    हणेगाव(दि.3फेब्रुवारी):-श्री राम मंदिर ची निर्मिती करण्यासाठी मंगळवार (ता.26) जानेवारी रोजी हणेगाव येथे निधी समर्पण अभियान चालू करण्यात आले..उत्तरप्रदेश मधील अयोध्या येथे श्री राम मंदिर बांधकामास सुरुवात करण्यात आले .यानिमित्ताने सर्वत्र निधी समर्पण अभियानास सुरुवात करण्यात आले हणेगाव येथील मन्मथ स्वामी मंदिर याठिकाणी अभियानाचे स्वरूप काय आहे या विषयी माहिती सांगून मन्मथ स्वामी मंदिर ते गावातील राम मंदिर पर्यंत बँड बाजा लाऊन सर्व हिंदू भक्तांनी पदयात्रा काढली यावेळी गावातील प्रत्येक गल्लीत जाऊन घरो घरी निधी ची मागणी करण्यात आले.

    गावातील भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे यावेळी हणेगाव मठाचे माठधिपती शंकरलिंग शिवाचार्य महाराज, देगलूर शहर कार्य वाहक प्रविण पांडे,दत्तात्रय मिलनकर,विवेक पडकं ठवार,पुरुषोत्तम अन्सापुरे,प्रविण इनामदार,संघटक अभिषेक उप्पे,युवराज स्वंतकर,बालाजी पोकल्वार ,मारोती बिरादार,योगेश जोशी, शिवकांत यन गुंदे,प्रशांत संतपुरे,हरिदास पडकांठवार,ओमकार मंठाळे, शांतलिंग स्वांतकर,ओमकार पंदरगे व नवयुवक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते…