पुसद येथे सुभेदार रामजीबाबा आंबेडकर स्मृतीदिन साजरा*

  32

  ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

  पुसद(दि.3फेब्रुवारी):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्या वतीने शुभेदार रामजीबाबा आंबेडकर यांचा १०८ वा स्मृतिदिन पारमिता बुद्ध विहार महाविर नगर येथे साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव प्रचार व पर्यटन भगवान बरडे हे उपस्थित होते.

  तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे , प्रल्हाद खडसे, मुख्याध्यापक संतोष सोनोने हे उपस्थित होते .या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व सुभेदार रामजीबाबा आंबेडकर आणि प. पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

  मुख्याध्यापक संतोष सोनोने यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रल्हाद खडसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य तुकाराम चवरे यांनी केले .तर आभार भगवान खंदारे यांनी मानले .
  यावेळी किसन धुळे, माजी सैनिक धम्मपाल पडघणे, शालूताई बरडे ,कौशल्याबाई कांबळे, विजया कांबळे, संगीता कांबळे, मिनाक्षी कांबळे, ईश्वरी सोनाळे ,सूर्या कांबळे, बाळासाहेब ढोले इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.