रणमोचन -किन्ही रस्त्यावर डांबरीकरण करा :- गावकऱ्यांची मागणी

84

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.3फेब्रुवारी):-तालुक्यातील रणमोचन- किन्ही मार्गाचे काही वर्षे अगोदर खडीकरण झाले होते. मात्र 300 ते 400 मीटर रस्ता डांबरीकरण झालेला आहे. तर जवळपास अर्धाच रस्ता म्हणजेच 200 ते 300 मीटर रस्ता खडीकरण असून त्या रस्त्यावर डांबरीकरण करावे.अशी मागणी रणमोचन व किन्ही येथील नागरिकांनी केली आहे.

सदर खडीकरण झालेला रस्ता ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे पूर्णतः उखडलेला असून त्या रस्त्याच्या दोन्ही बाजू काटेरी झुडपांनी वेढलेल्या असल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या सायकल, मोटारसायकल चालक व इतर वाहने चालवणार्‍या व्यक्तींना याचा फार मोठा त्रास होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

समोरून दुसरा वाहन येत असला की बाजूला उभे राहण्या साठी जागाच उरत नाही. त्यामुळे डोळ्याला झाडाच्या फांद्या लागतील की काय अशी भीती निर्माण होते. या ग्रामपंचायत क्षेत्रात हा रस्ता येत असेल त्यांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर झुडपी झाडे तोडावी. अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.