जावली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाईचा बोलबाला

38

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.३जानेवारी):-रिपाई (आ ) चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यातील अनेक ग्रामपंच्यातीमध्ये आरक्षित जागेवर रिपाई चे उमेदवार उभे करण्यात आले होते त्यापैकी १४ ठिकाणी उमेदवार निवडून आले.

जावली तालुक्यात रिपाई च्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याने गावागावात मोठ्या प्रमाणात संघटन वाढवून कार्यकर्त्यांनी तालुक्यात ४२ शाखा निर्माण केलेल्या आहेत , समाज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांच्या विरोधात रिपाई नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असल्याने जावली तालुक्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात रिपाई ( आ ) च्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रिपाईला प्रथमच मोठे यश मिळाले आहे .लवकरच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रिपाईचा करिश्मा दाखवणार असून रिपाई चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यात सर्व समाज्याला वंचित घटकांना सोबती घेऊन सर्वांची मोळी बांधण्याचे काम लवकरच करणार असे रिपाई चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी सांगितले.