गंगाखेड येथे व्यापा-यास दोन लाखाला लुबाडले चोर पसार

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4फेब्रुवारी):-गंगाखेड येथे ऐका व्यापा-यास चोरट्याने दोन लाखाला लुबाडले व चोर पसार झाले या मुळे व्यापार्‍यांत भितीचे वातावरण…गंगाखेड शहरातील बाजारपेठेतील आपले सुपरशाॅपीचे दुकान बंद करून घराकडे जाणार्‍या एका व्यापार्‍यास अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करीत त्यांच्याजवळील असलेली दोन लाख रुपयांनी भरलेली बॅग लूटल्याची घटना गंगाखेड येथे मंगळवारी ता.२ फेब्रुवारी रोजी रात्री ९;३० वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शहरातील व्यापा-यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की,गंगाखेड येथील वकील कॉलनीत कुणाल अनिल यानपल्लेवार यांचे गायत्री सुपर शॉपी हे दुकान आहे. मंगळवारी २ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुणाल यानपल्लेवार हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जात होते. दुकानापासून थोडे पुढे गेल्यानंतर असलेल्या चौकातील अंधाराचा फायदा घेत तिघांनी त्यांना थांबवत दमदाटी केली. थापडा मारत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावुन तिघे जण तेथून फरार झाले.

या प्रकरणी यानपल्लेवार यांनी गंगाखेड पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, फौजदार विठ्ठल घोगरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी यानपल्लेवार यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, दुकान बंद करून घरी जात असताना तीन व्यक्तींनी आपणास थांबवले. थापडा मारून, दमदाटी करून आपल्या जवळ असलेली एक लाख 95 हजार रुपये असलेली बॅग घेऊन ते फरार झाले. दोघे स्कुटीवर तर एक जण मोटारसायकलवर आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.