पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन स्मारक उभारावे – ना. छगन भुजबळ

30

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

सटाणा(दि.4फेब्रुवारी):- येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नुतनीकरण समारंभ राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.

पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारावे, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.हे स्थान अंधश्रद्धचे नसून ‘सेवा हाच धर्म’ असा संदेश देणारे आणि सर्व अंधश्रद्धा बाजूला सारुन सेवेचा आदर्श प्रस्तुत करणारे देवस्थान आहे. जनता संकटात असतांना देवमामलेदार यांनी जनतेला सहाय्य केले. त्या काळातील ते मोठे धाडस होते. त्यांचे हे कार्य सामाजिक क्षेत्रात आणि शासकीय सेवेत असलेल्यांसाठी मोठे उदाहरण आहे.

‘ऐसी करणी कर की नर का नारायण हो जाए ’अडचणीच्या काळात जनतेची सेवा करणे हे शासन आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. हे दोन्ही घटक मूळात जनसेवेसाठी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शासन निर्णयाचा उपयोग जनतेला होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी याची प्रेरणा देवमामलेदारांच्या स्मारकातून मिळते. या तीर्थस्थंळाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल.

जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. तीर्थस्थंळाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगीगड, नस्तनपूर, आणि टाकेद सारख्या तीर्थस्थंळाचा विकास करण्यात आला आहे. बोट क्लबच्या सुंदर कामाची दखल अमेरीकन नियतकालीकाने घेतली. देशात लौकिक होईल असे उत्तम स्मारक उभे करावे आणि त्याबरोबर पर्यटन वाढावे म्हणून शहरदेखील स्वच्छ ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामध्ये सेवा करणारे डॉक्टर आणि पारिचारीका यांचे सेवाकार्य गौरवपूर्ण आहे.

समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात. आपल्यातल्या देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतानी दिला आहे. हा आदर्श देवमामलेदार यांच्या जीवनातून घ्यावा. त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रबोधनीत ते पोहचविण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. देवमामलेदाराच्या जीवन चरित्रावर आधारीत लघूपट निर्मितीसाठी निधी देण्याचेही सहकार्य करण्यात येईल, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.
यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पुर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचेसमवेत देवमामलेदार श्री यशवंत महाराज मंदिराला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल महोदयासह श्री. भूसे यांचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते देवमामलेदार स्मारक नुतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्मारकाला भेट देवून माहिती घेतली