SRK कंपनी कामगारांना वेतन न मिळाल्याने प्रहार चे ठिय्या आंदोलन- कंपनीच्या गेटवर प्रहार सेवक यांनी जागली

32

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.4फेब्रुवारी):- वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षां पासून सूरु आहे पण मागील चार महिन्यांपासून SRK कंपनी ने कामगारांना वेतन न मिळाल्याने मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मजुरांनी प्रहार जनशक्ती पक्षच्या नेतृत्व १ फेब्रुवारी २०२१ सोमवार पासुन प्रहार जनशक्ती पक्ष चे बेमुदत आंदोलन सुरू आहे.

जो पर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती प्रहार सेवकांनी दिली. त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक सेरखान पठान ,प्रहार सेवक अक्षय बोंदुलवार राकेश भूतकर , सलीम पठान व कामगार उपस्थित आहे.