राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत रोहीत मडावी यांची भरारी!

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.4फेब्रुवारी):-कोविडमुक्त भारत या विषयावर आधारीत चित्रकला स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल रोहीत मडावी यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.!

कसनसुर ता एटापल्ली जिल्हा गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील रोहित बंडु मडावी यांनी युनेस्को स्कुल ऑफ महाराष्ट्र आणि असोसिएशन ऑफ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आँनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली व जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली तर्फे रोहीत मडावी यांचे सत्कार करण्यात आला.

यावेळी अनिल कोठारे जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. दौलत धुर्वे जिल्हा उपाध्यक्ष, बालाजी गावळे सामाजिक कार्यकर्ते, नागेश गावडे, सुरेश चौधरी, जिवन तुलावी, चंदन उसेंडी, रवींद्र तुलावी, सुरेश तुलावी उपस्थित होते.