निराधारांचे थांबलेले अनुदान तात्काळ वाटप करा – विश्वनाथ शिंदे मांजरमकर

32

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.4फेब्रुवारी):- तालुक्यातील श्रावणबाळ ,संजय गांधी निराधार योजना वृद्ध व गोरगरीब यांचे निराधारांचे अनुदान ऑक्टोबर महिन्यापासुन रखडले आहे अद्यापही या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे नायगाव तालुक्यात हजारो लाभार्थी आहेत या विविध योजनेतील लाभार्थी तहसील कार्यालयात गेल्या अनेक महिन्यापासून चकरा मारत आहेत तर प्रामुख्याने काही लाभार्थ्यांचे अंगठे येत नसल्याने त्यांना अनेक महिन्यापासुन अनुदान मिळत नाही.

अशा काही ना काहीतरी अडचणी येत आहेत व आपल्या अडचणी सोडविण्यासाठी लाभार्थी तहसील कार्यालयावर चकरा मारत आहेत परंतु त्यांची कोणीही दखल घ्यायला तयार नाही.

एकीकडे प्रशासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न चालु आहे पण पण वास्तविकता फार वेगळीच आहे अनेक निराधार लोक यापासुन वंचित आहेत काही लोकांच्या बँकेच्या खात्या मध्ये पैसे जमा होत नाही अशा विविध प्रकारच्या छोट्या-छोट्या अडचणी मुळे त्यांना हे मानधन मिळत नाही आहे या गोष्टीकडे कोणीच प्रामुख्याने लक्ष द्यायला तयार नाहीत तात्काळ यांच्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ असे ही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांनी सांगितले.