चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्वरीत सुरू करण्याचे मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने केली मागणी

29

🔸आगामी चिमूर नगरपालिकेच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.5फेब्रुवारी):-क्रांती जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करीत असताना मागील राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी देत पद भर्तीस मंजुरी दिली आणि अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची पण नियुक्ती करण्यात आल्यावर सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले नाही परंतु शासनाने तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर सुद्धा आक्षेप मागविले त्यामुळे चिमूरकरात भीतीचा सूर निघत असल्याने चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडेकर , याना प्रत्यक्ष भेटून चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी करीत आगामी चिमूर नगरपरिषद निवडणूकिसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे .त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कक्षात शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले तेंव्हा त्यांनी गावाची यादी प्रसिद्ध करणे तो शासन आदेशाचा भाग असल्याचे सांगितले जर काही गावे सुटले तर यात समाविष्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले .

चिमूर क्रांती जिल्हा समितीचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, सचिव सुनील मैंद, गजानन अगडे , प्रकाश बोकारे, कृष्णा तपासे , हेमंत जांभूळे , बाळकृष्ण बोभाटे , अविनाश अगडे,माधव बिरजे ,मनीष नंदेश्वर ,प्रवीण सातपुते , ललिता नंदरधने, सिंधुताई रामटेके ,गणपत खोबरे ,भरत बंडे आदी उपस्थित होते . जिल्हाधिकारी बाहेर दौऱ्यावर असल्याने सुरवातीला विधुत वरखेडेकर अपर जिल्हाधिकारी यांचेशी सविस्तरपणे चर्चा केली असता अपर जिल्हाधिकारी चिमूर चा पदभार माझेकडे असून तेथील कार्यालयीन कामकाज साठी आवश्यक फर्निचर इतर आवश्यक बाबी साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना बोलावून तेथील सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे अंदाजपत्रक तयार करून ते तेथे निर्माण करणे आदि व कोरोनाच्या परिस्थिती मुळे हे कार्यालय सुरू होण्याची अडचण झाली आहे.

त्यामुळे मी लवकरच तेथे कामकाज सुरू करू असे वरखेडकर म्हणाल्या व आक्षेपाबाबत मला माहिती नसल्याने मी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून त्यावर माहिती मिळेल असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.जेंव्हा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने बाहेर दौऱ्यावर होते तेंव्हा जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे यांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ४ वाजेपर्यंत येत असल्याचे सांगितले तेंव्हा सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कक्षात शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले तेंव्हा त्यांनी गावाची यादी प्रसिद्ध करणे तो शासन आदेशाचा भाग असल्याचे सांगितले जर काही गावे सुटले तर यात समाविष्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले आणि लवकरच कार्यालय सुरू करण्यात येईल असे सांगितले.