राष्ट्रवादीचे माणिक गायकवाड यांचे निधन

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.5फेब्रुवारी):- सिरसाळा परिसरातील तरुण तडफदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माणिक गायकवाड यांचे बुधवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरूना संसर्गाने झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसापासून माणिक गायकवाड आजारी होते सतत धावपळ सामान्य जनतेच्या हितार्थ कार्य मग्न, राजकीय कारकिर्दीत व्यस्त असल्याने कोरोना चा संसर्ग झाल्याने लवकर समजले नाही.

कोरोना चा संसर्गाने अंगात वाढला आणि उपचारादरम्यान लातूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झाला. माणिक गायकवाड खामगाव (पूर्वीचे धारूर तालुका) येथील भूमिपुत्र आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने खामगाव सह सिरसाळा परिसरातील नागरिकांत दुःख व्यक्त केले जात आहे. कसलाही राजकीय वारसा नसताना सामान्य शेतकरी मजूर कुटुंबातून त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपले वलय/ कार्य निर्माण केले. खामगाव ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ही पदे भूषवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी त्यांनी कार्य केले पक्षात त्यांचे कार्य उत्तम असल्याने माननीय शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला.

माजी आमदार उषाताई दराडे विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे ते खास विश्वासू कार्यकर्ते होते त्यांची परळी धारूर माजलगाव हा तिने तालुक्यात राजकीय शैक्षणिक कार्य मोलाचे आहे ते आंबेडकर चळवळीत देखील सक्रिय होते माजी आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेने त्यांनी अनेक दिवस कार्यक्रम बीड जिल्हा अध्यक्षपद भूषवत दलित/ बौद्ध बांधवावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढा दिला त्यांच्या अकाली निधनाने सिरसाळा सिरसाळा परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांची कमी जाणवणार आहे. खामगाव सह सिरसाळा परिसरातील नागरिकांत दुःख व्यक्त केले जात आहे.