बिलोली तालुक्यात भाजपच्या वतीने लाईट बिल संदर्भात ताला ठोको हल्ला बोल आंदोलन

    37

    ?महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.6फेब्रुवारी):-महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात करणाऱ्या महाराष्ट्र आघाडी सरकारचे निषेधार्थ शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्युत वितरण कार्यालय बिलोली येथे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये बिलोली तालुक्यातील घरगुती ग्राहक व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आवाच्या सव्वा बिले देऊन मोठी अडचण महावितरण कंपनी मार्फत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज मोठे जनआंदोलन बिलोली तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले होते या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी अशी की कोरोना काळामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या लाईट बिल माफी बाबत जे वक्तव्य त्यांनी केले होते त्याबद्दल घुमजाव केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

    तसेच बिलोली तालुक्यात घरगुती व्यापारी शेतकरी ग्राहक आपल्या तालुक्यात आहेत त्यांना दोन दोन महिने रिडींग न घेतल्यामुळे आवरेज बिल दिल्यामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे रेडींग घेणारे यंत्रणा अतिशय कामचुकार पद्धतीने काम करीत आहे व तसेच विद्युत विभाग मंडळामार्फत वीज बिल बाबत 18 टक्के व्याज आकारणी करण्यात येत आहे.

    ती कायमची रद्द करण्यात यावी अशा अनेक अडचणी बाबत आज भारतीय जनता पार्टी मार्फत ताला ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आली या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठकरवाड जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत गोपछडे, आनंद बिराजदार, शांतेश्वर पाटील, शंकरराव काळे, श्रीनिवास पाटील नरवाडे, शैलेश पाटील, इंद्रजीत तुडमे, शिवकन्या सुरकुटलावार मारुती दगडे, सूर्यकांत शिंदे, मारुती राहिरे, साईनाथ शिरोळे, आबाराव संगनोड,नागनाथ पा.माचनुरकर,बळवंत पा.लुटे,संभाजी शेळके,शिवाजी तुकडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.