लोकशाहीच्या नांवान चांगभलं !

    43

    ✒️लेखक:-समाज भुषण आयु.सयाजी वाघमारे(मो:-70394 83438)

    एकदा जंगलातील प्राण्यांना वाटले की – आपण प्राण्यांनी देखील , लोकशाही व्यवस्था निर्माण व त्यासाठी घटनेची निर्मिती करण्यासाठी सर्व प्राण्याची एक सभा बोलावली. लोकशाही व्यवस्थेमुळे आपल्या सर्वांच्या वाट्याला सुखसमाधानाचे दिवस येणार. म्हणून मोठ्या संख्येने जंगलातील प्राण्यांनी सभेला गर्दी केली होती.

    घटना निर्मितीच्या कामकाजाला सुरुवात होताच , सर्वप्रथम गजराज म्हणजे शरीर प्रकृतीने बलदंड बुद्धिवान म्हणून ख्याती आणि जगाला शांतीचा मार्ग दाखिण्याऱ्या *तथागत बुद्धाला* समोर येताना पाहून, बेभान झालेल्या हत्तीने, त्यांचा समोर नतमस्तक झाल्याची बौद्ध जातक कथा, जगाला गुणवान प्राणी म्हणून हत्तीची ओळख झाली आहे. त्या हत्तीने घटनेचे पाहिले प्रकरण म्हणून ठराव मांडला की कोणताही प्राणी, कुणाची हत्या करणार नाही . ठराव जाहीर होताच सगळ्या प्राण्यांनी जल्लोष सुरू केला.

    ठरावाला पाठिंबा म्हणून प्राण्यांच्या कडून निरनिराळे चित्कार होऊ लागले. त्याच दरम्यान सिंहाची लाईट पेटली . तो स्वगत बोलता झाला , हत्या करायची नाही . तर मग आपण खायचे काय ?हा ठराव म्हणजे आपल्यावर उपाशी मरायची वेळ येणार ! हे लक्षात येताच , त्याने गर्जना केली . या ठरावाला माझी दुरुस्ती आहे . की कोणीही गरजे शिवाय हत्या करता कामा नये . प्राण्यांना दुरुस्तीचा अर्थ समजला . सभेमध्ये शांतता पसरली जणूकाही प्राण्याची मूक संमती आहे .

    दुसरा ठराव, सर्व प्राण्यांमध्ये जो ताकदवान चपळ असून स्वामिनिष्ठ म्हणून महाभारतात मृत्युंजय कर्णाचा *वायुजीत* , पंधराव्या शतकात महाराणा प्रतापचा *चेतक* , सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांचा *कृष्णा* , ह्या अश्‍वानी आपली नावे आजरामर केली , अश्वशक्ती म्हणून इंजिनाचे परिणाम ज्याच्या शक्तीनुसार ठरविले जाते . अशा अश्ववर्गातील एका आश्वाने *सारे प्राणी समान* म्हणून ठराव मांडला पून्हा आनंदाचे चित्कार काढून प्राण्याने पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याचे आवाज थांबत नाही.

    तोच वाघोबाची ट्यूब पेटते. तो स्वगत बोलतो . सारे प्राणी समान म्हणजे गाढव आणि आपण समान . नाही हे जमणार नाही . म्हणून वाघोबा गर्जना करीत ठरावाला दुरुस्ती सुचवितात *काही प्राणी काही ठिकाणी समान असतील* प्राण्यांना दुरुस्ती चा अर्थ समजला. परंतु वाघोबा पुढे बोलणार कोण ? दुरुस्तीला मूक संमती आहे . या अर्थाची सभेत शांतता पसरली .

    जंगलामध्ये सर्व प्राण्यांना सुखा- समाधानाने जगता यावे , म्हणून लोकशाहीचा पाया असलेल्या घटना निर्मिती आणि घटनेच्या कलमांची दुरुस्ती म्हणजे ज्याची शक्ती त्याची मस्ती असेच होणार हे ओळखून *हरण , ससा , चितळ, जिराफ* इत्यादी प्राणी लपत, छपत जगणे चुकणार नाही . असे स्वगत बडबडत सभा सोडून गेले.

    प्राण्यांच्या लोकशाहीचे विडंबन,आज जित्या- जागत्या माणसाच्या भारत देशात चालू आहे . भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल २५ ( ऐ ) आणि आर्टिकल २९० सन १९५६ मध्ये १९७५ च्या घटना दुरुस्ती नुसार प्रियांबल उद् घोषणे मध्ये सेक्युलर धर्मातीत निधर्मी असा समावेश करण्यात आला आहे. सरळ अर्थ हा देश निधर्मी असेल.

    ज्या देशाच्या लोकशाही संविधानाच्या उदघोषणेत निधर्म राष्ट्र म्हणून उल्लेख आहे . त्या देशाचा पंतप्रधान प्रभू रामचंद्राचे मंदिर निर्माण करण्याचा कोनशिला स्वहस्ते बसवितो . जो प्रभुराम ज्यांनी विद्यासंपादन केली म्हणून संबुकाचा वध केला. संविधानाची किती मोठी विटंबना ! आणि त्या रामाचे मंदिर बांधण्यासाठी ” राम मंदिर बांधकामासाठी खंडणीचा आरोप” लोकसत्ता दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ बातमी वर्धा भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने राम मंदिर बांधकामासाठी देणगीच्या नावे शिवीगाळ करीत खंडणी मागण्याचा आरोप.

    दुसरीकडे आंदोलन सुरक्षा भिंत , तारेचे कुंपण उभारून शेतकऱ्यांची नाकाबंदी केली जाते . जे शेतकरी गेले ६६ दिवस , अत्यंत शांततामय रित्या सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. आजपर्यंत ७५ पेक्षा जास्त संख्येने शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत . तरी देखील लोकशाही व्यवस्थेमुळे सत्तास्थानी बसलेली पंतप्रधान प्रश्न सोडविण्यासाठी मागे हटण्यास तयार नाहीत. उलट आंदोलन चिरडण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसते.

    देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशाचे सरकार भारतीय स्वतंत्रता संग्राम की प्रेरणादायी जनक्रांती *चौरी चौरा आंदोलन* के 100 वे वर्ष में प्रवेश के अवसर पर आयोजित चौरी चौरा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात गुंतले आहे. ज्याचा भारतीय स्वतंत्र्य ता संग्रामाचा काडीचाही वाटा नाही. त्या उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेवर ७५ हून जास्त घेतले जास्त शेतकऱ्यांचे बळी घेतले जातात.केवढा हा विरोधाभास ?