परळी भाजपा पदाधिका-यांनी महिवितरण कार्यालवर हल्लाबोल करत ठोकले कुलुप

25

🔹राज्य सरकारच्या तिघाडी धोरणांचा जाहिर केला निषेध

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.7फेब्रुवारी):-महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतिने महावितरणच्या विरोधात राज्यभर महावितरण कार्यालयाला तालाठोक व हल्लाबोल आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीच्या महावितरण कार्यालयावर परळी शहर व तालुक्यातील भाजपाच्या कायकर्त्यांनी कार्यालयाला ताला ठोक आंदोलन करुन हल्लाबोल करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांनी राज्य सरकारचा निषेध करत महावितरणच्या कारभारात कोणताही ताळमेळ नाही, मंत्री म्हणतात वीज बिल माफ करू, तर उपमुख्यमंत्री सांगतात लाईट बिल भरा, नाहीतर वीज तोडू. या कारभारात ग्राहक भरडला जात असून या संदर्भात परळी भारतीय जनता पार्टीच्या वतिने आज राज्य सरकारच्या तिघाडी धोरणांचा जाहिर निषेध करत आंदोलन करण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.तर शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी महावितरणच्या कारभाराचे वाबाडे काढत म्हणाले कि,महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या निषेधार्थ भाजपा रस्त्यावर उतरली असल्याचे सांगितले.

या टाळाठोक आंदोलनात भाजपा चे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके,श्रीहरी मुंडे, जिवराज ढाकणे, ,शिवाजीराव गुट्टे, रिपाई नेते भास्कर रोडे,शालिनी कराड,प्रभाकर दादा फड, बळीराम गडदे,भीमराव मुंडे,रवि कांदे,उमेश खाडे, बिभीषण फड, वैजनाथ जगतकर,सुरेश माने,राजेंद्र ओझा, रमेश गायकवाड,अशोक आघाव, अजय गित्ते, चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, भुराज बदने, पिंटू कोपनर, शिवराज मुंडे, नरसिंग सिरसाठ, किशोर केंद्रे,मोहन जोशी, योगेश पांडकर, संजय मुंडे, श्याम गित्ते, नितीन समशेट्टी, पवन मोदानी, सुधाकर पौळ, प्रितेश तोतला,चंद्रकांत मुंडे, दिलीप नेहरकर, नरेश पिंपळे, अश्विन मोगरकर, सुशील हरगुळे, माऊली साबळे, गणेश होंळबे,प्रल्हाद सुरवसे, गोपीनाथ गित्ते, धनराज कुरील,गोविंद मोहेकर अदी असंख्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते.