गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे सुप्रसिद्ध गझलकार आ. नितीन देशमुख आणि सुप्रसिद्ध गझल गायक आ. डाॅ. राजेश उमाळे यांची लाईव्ह मुलाखत

33

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

तरी सर्वांनी गझल मंथन यू ट्यूब चॅनेलच्या लिंकला http://youtube.com/c/गझलमंथनसमूह सबस्क्राईब करण्याचे आवाहन संस्थेचे सचिव आ. जयवंत वानखडे सर यांच्यातर्फे करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध गझलकार आ. नितीन देशमुख आणि सुप्रसिद्ध गझल गायक आ. डाॅ. राजेश उमाळे या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. सुप्रसिद्ध गझलकारा आ. क्षिप्रा मानकर मॅडम ही मुलाखत त्यांच्या खास शैलीत घेणार आहेत. गझलेसंबंधीत चर्चा या मुलाखतीत होणार आहे. सदर मुलाखत ही गझल शिकणाऱ्यांसाठी आणि गझल रसिकांसाठी महत्त्वाची पर्वणी ठरणार आहे.

ही मुलाखत बघतांना आपण आपल्या लाईव्ह कमेंट्स देऊ शकता. गझल मंथन साहित्य संस्थेच्या सहसचिव आ. उमा पाटील मॅडम यांच्यातर्फे ही संकल्पना मांडण्यात आली आहे. गझल मंथन साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष आ. देवकुमार गुमटकर सर यांचे या मुलाखतीसाठी तांत्रिक साहाय्य लाभत आहे. या मुलाखतीबद्दल अधिक माहितीसाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे सर ९०२९२५५४५२ या नंबरवर संपर्क साधावा. या मुलाखतीला सर्वांनी भरभरून प्रतिसाद देवून ही मुलाखत यशस्वी करण्याचे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे सर्वांना करण्यात येत आहे.