गुन्हेच घडू नयेत यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा – छगन भुजबळ

34

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

येवला(दि.7फेब्रुवारी):- येवला प्रशासकीय संकुल येथे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पार पडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समरसिंग साळवे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता शरद राजभोर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, श्री. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, आंबदास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक श्री. ससकर, जिल्हापरिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, दीपक लोणारी, सचिन कळमकर, ज्ञानेश्वर शेवाळे,सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.

चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा.नाशिक जिल्हा शेतीव्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहे

अद्यापही प्रशासकीय संकुलात अजून विविध विकासकामे करायची आहेत. देशाला मॉडेल ठरेल अशी ही वास्तू निर्माण केली. त्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. येवला प्रशासकीय संकुल हे देशातील शासकीय वास्तंमधील रोड मॉडेल आहे. त्यामुळे या ही वास्तू चांगली ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

ग्रामपंचायत निवडून विजयी आणि पराभूत झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन गावांचा विकास साधावा या संकुलात आजपर्यंत उपविभागीय अधिकारी(प्रांत) कार्यालय, तालुकास्तरीय प्रशासकिय इमारत (तहसिल कार्यालय), पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद इमारत, फलोत्पादन अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय सा.बां.विभाग कार्यालय, दुकान निरीक्षक कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, बहुउद्देशिय हॉल इ . इमारती पूर्ण झालेल्या असून कार्यान्वयीत झालेल्या आहेत. त्यात पोलीस स्टेशनचा समावेश झाला असून राहिलेली कामे लवकरच पूर्ण केले जातील.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

अशी आहे येवला तालुका पोलीस स्टेशन इमारत

येवला शहरात विखुरलेल्या स्वरुपात अडगळीच्या ठिकाणी व अपूऱ्या जागेत तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ३३ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ – ४२५० चौ.फुट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलिस स्टेशन इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एस.एच.ओ.कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधन गृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष , रेकॉर्ड रुम, दिव्यांगासाठीचा रॅम्प तसेच इतर सोयीसुविधा असणार आहेत.