यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकाचे प्रकाशन

    46

    ?जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक – शेखर देशमुख

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.8फेब्रुवारी):- मानवी जीवनात बरे वाईट अनुभव येतच असतात . त्यातून आपण खूप काही शिकत असतो. त्या जीवनानुभवाचे उत्तम लेखन झाले पाहिजे. साहित्य लेखनातून जीवनाला नवी उर्जा मिळत असते , असे प्रतिपादन पोलिस उप अधिक्षक शेखर देशमुख यांनी येथे केले. नक्षत्राचं देणं काव्यमंच द्वारा आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस उप अधिक्षक शेखर देशमुख यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते . रमाई जयंती दिनी आयोजित श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

    मिल्ट्री स्कुलचे माजी प्राचार्य तथा पर्यावरण स्तंभलेखक विजय मार्कंडेवार , भाष्यकार प्रा. डाॕ. राज मुसने, जि.प.चे सेवानिवृत्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर, ग्रंथलेखक यवनाश्व गेडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावनापर मनोगत यवनाश्व गेडकर यांनी केले. स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकात लेखकांनी व्यक्त केलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे , त्यात दिवंगत पत्नीविषयीच्या आठवणीचा पूर दिसून येतो, असे मत प्रा.डाॕ. मुसने यांनी व्यक्त केले. ह्या पत्नीविषयक चरित्रात्मक पुस्तकात विरह ,करूणा, प्रेम, समर्पण याचाओलावा ह्या पुस्तकाच्या पानोपानी दिसून येते तसेच सांसरिक अनुबंंध आणि मानसिक साहचर्याचे दर्शन घडते ,असे मत बंडोपंत बोढेकर यांनी केले.

    याप्रसंगी गणित विषयात गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या सौ. विद्या अभय घटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नामदेव गेडकर यांनी केले तर आभार नारायण सहारे यांनी मानले. कार्यक्रमास श्रोते मंडळीत प्रा. श्रावण बानासुरे , रमेश रामटेके , प्राचार्य डोंगे , प्रकाश चांभारे, विलास उगे, सरिता गव्हारे ,देवराव कोंडेकर , मंजुषा खानेकर , अनिल दहागावकर ,धनजंय तावाडे , श्रीकांत प्रतापवार , प्रा. मोरे, डाॕ. धर्मा गांवडे , सौ. हेमश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.