परळी येथील नवाज फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

    34

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(प्रतिनिधी) येथील नवाज फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख लतीफ भाई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अर्शद ,माजी नगरसेवक हाजी बाबूभाई मिस्कीन नुकताच परळी भूषण पुरस्काराने सन्मानित जाफरखान , समाजसेवक जमिल अध्यक्ष व शेख महेबुब भाई गुत्तेदार उपस्थित होते.सध्या कोविड-19 मुळे राज्यात व जिल्ह्यामध्ये रक्ताची कमी आहे त्यामुळे नवाज फाउंडेशनने हा निर्णय घेतला होता की रक्तदान शिबिर आयोजित करू, तर आज ८ फेब्रुवारी सोमवारी हे शिबिर आयोजित केला होता.

    मान्यवरांनी आपल्या भाषणात नवाज फाऊंडेशनच्या कामाचा कौतुक केला आणि भविष्यामध्ये या फाऊंडेशने समाजासाठी काम करावा अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख लतीफ, मुफ्ती अशफाक साहब, मौलाना तुमैर सहाब, शकील सर, ईफतेखार सर, शेख एकबाल, शेख शोएब,व नवाज फाउंडेशन परळी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.शेवटी शेख लतीफ अध्यक्ष नवाज फाउंडेशन यांनी सर्वांच्या आभार व्यक्त केला