दोन वाघांच्या झुंझीमध्ये एकाचा मृत्यू- व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी.गुरुप्रसाद

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.10फेब्रुवारी):- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत दि. 9 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहिती नुसार अर्जुंनी गावालगत भानुसखिंडी पी.एफ. पासून 200 मीटर अंतरावर प्रल्हाद नामेदव किटे, रा. अर्जुंनी यांचे शेतात स. 10.30 वाजता वाघ मृत अवस्थेत आढळून आला. सदर पूर्ण वाढ झालेल्या नर वाघाचा मृत्यु प्राथमिक दृष्टया दोन वाघाच्या झुंजीमध्ये झाल्याचे दिसून येत असून मृत वाघाच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर व पाठीमागील डाव्या पायावर जखमेचे निशाण आहेत.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या मानक कार्यप्रणालीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येवून उपसंचलाक (बफर) जी. गुरुप्रसाद, उपसंचालक (कोअर) श्री. काळे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, पीसीसीएफ प्रतिनिधी मुकेश भांदक्कर, सहाय्यक वनसंरक्षक श्री. खोरे, श्री. येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी .मून, श्री. शेंडे, पशुवैद्यकीय चमूचे श्री. खोब्रागडे, श्री. पोरचेलवार, राहूल शेंद्रे यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले असल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी.गुरुप्रसाद यांनी कळविले आहे.