सेवानिवृत मंडळाधिकारी सुपेकर यांचे निधन

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11फेब्रुवारी):- येथील सेवानिवृत मंडळाधिकारी तलाठी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार शेषराव जोशी उर्फ सुपेकर यांचे दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ५:४५ वा.रहात्या घरी माँर्निंगवाक करतांना अचानक र्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,मुत्यु समयी त्यांचे वय ६१ होते.

त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा,जावई,पत्नी,तीन भाऊ व एक बहिण असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.इसाद येथील बालाजी विद्यालयाचे मुख्यध्यापक रंगराव सुपेकर यांचे ते मोठे भाऊ होत.