नासिक विभागीय आयुक्त कार्यालयातील नुतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन

✒️विजय केदारे(निफाड प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.12फेब्रुवारी):-विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून या नुतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन व नियोजन सभागृहाच्या कोनाशिलेचे अनावरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, नितीन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून नियोजन सभागृहाच्या बळकटीकरणासाठी एक कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या अनुषंगाने नियोजन सभागृहात 200 व्यक्ति बसतील अशा स्वरूपाची आसन व्यवस्था करण्यात आली असून मुख्य व्यासपीठावरील बैठक व्यवस्था व पोडियम नव्याने तयार करण्यात आले आहे. तसेच सभागृहात सादरीकरणासाठी एकूण आठ दूरचित्रवाणी संच, नवीन श्रवण यंत्रणा, मध्यवर्ती वातानुकुलीत यंत्रणा सभागृहात बसविण्यात येवून विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहाचे अद्यावतीकरण व सुशोभिकरण करण्यात आले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED