प्रहार च्या आदोंलनाची पाटोद्यात वीज कंपनीने घेतली दखल,आठ तास सुरळीत वीजपुरवठा होणार

28

🔹शेतकरी वर्ग आनंदी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.12फेब्रुवारी):-येवला तालुक्यातील पाटोदा परिसरातून पालखेड डावा कालवा जात असलेल्या कालव्यास सध्या रब्बी आवर्तन चालू असून जल संपदा विभागाचे आदेशाने वीज वितरण कंपनीस कालवा परिसरातील शेती पंपाचा पाणी उपसा होऊ नये म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्याचे तोंडी आदेश दिले.परंतु वीज वितरण कंपनी नेहमी प्रमाणे
कालवा परिसरातील वीज खंडित न करता सरसकट पूर्ण मेन वाहिनीच खंडित करून कालवा परिसरापासून दोन्ही बाजूच्या सुमारे पाच किलोमीटर वीज पुरवठा खंडित करून बसल्या जागीच काम भागवून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
यावर गेली तीन वर्ष पाटोदा प्रहार शाखेच्या पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्याकडे तोंडी विचारणा करत असत परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण करण्यात वीज कंपनी धन्यता मानत होती.या बाबत काल संध्याकाळी पाटोदा येथील प्रहार कार्यकर्त्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली असता तातडीने आज जोवर पूर्ण वेळ अखंडित वीज पुरवठा सुरू होत नाही तोवर वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन होऊन आज बारा वाजेच्या सुमारास पाटोदा कार्यालयाचे वीज अभियंता श्री चौधरी साहेब यांना निवेदन देत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.

अधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना जुमानत नाही असे दिसताच चार वाजेच्या सुमारास प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, तालुका संघटक किरण चरमळ, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे यांनी आंदोलन स्थळी जात वीज वितरणचे स्थानिक व वरिष्ठ अधिकारी,जलसंपदा येवला विभागाचे अभियंता व कार्यकारी अभियंता यांना वस्तुस्थिती पटवून देत साडेचार वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

यावेळी हरिभाऊ महाजन,अमोल फरताळे,किरणचरमळ,रामभाऊ नाईकवाडे, शंकर गायके,गोरख निर्मळ,बापूसाहेब शेलार,सुनील पाचपुते,दत्तू बोरणारे,बाळासाहेब बोराडे,श्याम मेगाने, ज्ञानेश्वर बोरणारे,ज्ञानेश्वर महाले,शंकर नाईकवाडे,नितीन मेगाने,संजय बोराडे,किशोर भोसले,सोपान जाधव,धनंजय पाचपुते,किरण पाचपुते, मनोज कुंभकर्ण, गणेश कुंभकर्ण, अमोल मेगाने,सचिन बोराडे,कृष्णा घोरपडे आदी परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते