वीर हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये अर्भक सापडल्याने खळबळ

    33

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे):-9075913114

    गेवराई(दि.12फेब्रुवारी):-शहरातील जालना रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलच्या स्वच्छता गृह ( टॉयलेट ) मध्ये एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. बीडमधील जालना रोडवरील वीर हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये नवजात अर्भक मिळाल्याची माहिती कळताच शहर ठाण्याचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले आहेत.

    सदरील अर्भक पुरुष जातीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. टॉयलेटमध्ये अर्भक कसे आले याचा तपास सुरू आहे. दरम्यान एक महिला रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती.बाथरूममधून आल्यानंतर ती महिला परत घरी गेल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नेमका प्रकार काय हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.