कोरोणा विषाणू आजाराविषयी चाणक्य उर्फ मैत्रेय कला पथकाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न

27

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.12फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासन ,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई , जिल्हा माहिती कार्यालय नाशिक व भारत सरकार ,युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक संलग्न मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक संचलित चाणक्य / मैत्रेय कलामंच ( कलापथक ) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषाणू महामारी रोगाविषयी जनजागृती कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे .विविध गावांमध्ये चाणक्य / मैञेय कलामंच ( कलापथक ) यांच्या माध्यमातून कोरोना विषाणु आजाराची लक्षणे ,उपचार,खबरदारी व बचाव आदी विषयांवर तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

दिनांक 19 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यातील वावी ,ता.सिन्नर ,कोहर व करंजाळी, ता. पेठ ,देवसाने ,ता. दिंडोरी ,पालखेड ,ता.निफाड ,कुकाने, ता. मालेगांव ,बोयेगांव ,नांदुर ,खादगांव ,ता. नांदगांव ,रेल्वे स्टेशन नाशिक रोड व देवळालीगांव ,नाशिक रोड ,नाशिक इत्यादी ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला .पुढील योजनांची माहीती सांगण्यात आली.माझे कुटुंब माझी जबाबदारी ,महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना ,शिवभोजन थाली ,मा.छगन भुजबळ अन्न व पुरवठा मंञी यांनी तिन महिने मोफत रेशन वाटप केले.

खा.मा. गोपीनाथजी मुंडे शेतकरी कर्ज माफी योजना ,माझी कन्या भाग्यश्री योजना ,जननी सुरक्षा कन्यादान योजना, आंतर जातीय विवाह योजना ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ,राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार ,मुख्यमंत्री स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ,मराठा युवकांसाठी सारथी योजना , महाज्योती प्रशिक्षण संस्था सुरु करणे ,अमृत संस्था स्थापन करणे, मिशन बिगीन अगेन ,मा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार, 6 ते 18 वर्षाच्या दृष्टिदोष असणाऱ्यांना मोफत चष्मे वाटप , बिल्डिंग कामगारांना 5000/- रुपये मदत ,लर्निंग फॉर्म होम ,24 तास शैक्षणिक कार्यक्रम,उसतोड व स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचविणे ,कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी विकेल तेच पिकेल हे धोरण हाती घेतले ,महात्मा फुले जन आरोग्य योजना ,महाजॉब पोर्टल सुरू केले ,आदिवासी कुटुंबासाठी खावटी योजना, रेशन कार्ड व जात पडताळणी प्रमाणपत्र मोफत वाटप , एस.सी .व एस.टी.च्या एम. पी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांसाठी 26,000 /- रुपये मदत देण्यात आली ,चक्रीवादळ ,गारपीट ,अतिवृष्टी या काळात गरजु व्यक्तींना निधी उपलब्ध करून देण्यात आला.

याच कालावधिमध्ये पोलीस , डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ते ,आरोग्य विभागासी निगडीत असणाऱ्या सर्वांनी खुप परिश्रम घेऊन स्वतः चा जिव धोक्यात घालुन काम केले तसेच शासनाच्या वतीने 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालेले असून ते सर्वांनी करून घ्यावेच, लसीकरणाचे फायदे सर्वांना समजून सांगण्यात आले .नदी प्रदूषणमुक्त कशी राहील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .आदी विविध योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये डॉ.राजेश साळुंके- कार्यक्रम समन्वयक ,संजय आव्हाड सिनेपार्श्वगायक, संतोष वाळवंटे -ढोलकी वादक ,साहिल मोरया ,सुचिताताई साळुंके ,बबीताताई वाळवंटे ,मंगलताई आव्हाड ,श्रेया वाळवंटे ,अजय वाघमारे, पूजा शिंदे ,शुभम वाघमारे ,अलकाताई गवळी ,संचिता वाळवंटे ,विकास गायकवाड – गायक आदींनी सहभाग घेऊन कार्यक्रम उत्कृष्टपणे यशस्वी पार पाडण्यात आला.