नंदुरबार,धुळे,नंदुरबार,जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाचा वधू – वर परिचय मेळावा शिंदखेडा तालुक्यातील पाटण (आशापूरी) देवीच्या मंदिरावर आयोजित

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.12फेब्रुवारी):- दि. 21 फेब्रुवारी वार रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी कोळी समाज वधुवर सूचक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
लग्न म्हटले म्हणजे वधू- पाहण्याची मोठी कसरत असते. त्यातच वेळ आणि पैसा खर्च होतो, या साऱ्या गोष्टी लक्षात घेता वधुवर परिचय मेळावा घेण्याची समाज मान्यता पुढे आली आहे . त्याला चालना देण्यासाठी समाजातील सक्रिय कार्यकर्ता रविभाऊ शिरसाठ यांनी व्हाट्सएपग्रुप तयार करून धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील भावी वधू वर यांचा बायोडेटा तयार करण्याचे काम हाती घेतले होते, त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला आहे, याच माध्यमातून अनेक कुटुंबियांच्या पाल्यांचे विवाह जुळून आलेत. आता त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी भव्य वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी कोळी समाज वधू वर सूचक मंडळाचे रवीभाऊ शिरसाठ, आमोल निकुमे, दादासाहेब येळवे, हिराभाऊ वाकडे, निलेश पवार, संदिप येळवे, दिलीप बागुल, दिलीप शिरसाठ, प्रा.आप्पासाहेब कोळी, मयुर सोनवणे,प्रकाश सोनवणे सर, सतीश ईशी सर, भैयासाहेब कोळी, सागर निकुमे, नितीन सावळे, मनोज शिरसाठ,देवेंद्र कुवर सर, प्रशांत वाकडे, विकास कोळी, इश्वर कोळी, विजय कोळी, प्रा.डाॅ. राजेंद्र निकुम, संजय निकुम,किरण कुवर, हेमराज बोरसे, राहुल ईशी, दत्ता कोळी, राज कोळी,इश्वर जाधव , आमोल शिरसाठ (पत्रकार) रविंद्र चव्हाण (पत्रकार) दिपक सोनवणे, धनराज सांळुखे, विनोद शिंदे (पत्रकार) युगांत जाधव, विजय सावळे, रवि कोळी, मनोज शिरसाठ (पत्रकार), दिलीप सांळुखे(पत्रकार), राकेश कुवर(पत्रकार)लोटन सांळुखे, संजय निकम, संजय दावळे(पत्रकार) सौ. कल्पना बोरसे सौ. इंदूताई सोनिस,सौ.सोनाली अखडमल, सौ.जयश्री शिरसाठ सौ.वैशाली महाले ऍड शोभाताई खैरनार, सौ.कविता मोरे, या पदाधिकाऱ्यांनी केले आहे,