धुळे भर बाजार पेठ मध्ये सरकार मान्य परमिट रूम बियर बार व दारूची दुकाने स्थलांतरीत करावे

26

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.12फेब्रुवारी):-दि.११/०२/३०२१ रोजी चैनी रोडवरील गल्ली नं ४/५ च्या मधील भर बाजारपेठ असणारे सरकारमान्य परमिट रूम बियरबार, व दारू चे दुकाने स्थलांतरित करावे अशा आशयाचे निवेदन धुळे उपजिल्हाधिकारी मा. श्री. गोविंद दाणेज यांना महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या वतीने देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील महिला भगीनी तसेच बाजारपेठेत खरेदी साठी येणाऱ्या व दररोज ये जा करणा-या महीला भगिनींना येथील दारूच्या दुकांनामुळे दारू पिण्यासाठी येणाऱ्या दारूड्यांच्या छेडखानी, भानगडी, यांना सामोरे जावे लागते रात्री अपरात्री नाईलाजाने कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या महीलांना अगदी दहशती च्या वातावरणात च्या येथून जावे लागते कारण आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत भरगच्च वस्तीत जवळपास चार ते पाच दारूचे दुकाने तसेच बियरबार आहेत.

त्यामुळे दररोज या दुकानांच्या आसपास तळीरांमांनी उच्छाद मांडलेला असतो.त्यामुळे येथील परीसरात ये जा करणा-या महिलांच्या वतीने दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या सौ गीतांजली कोळी, वंदना बडगुजर, संगीता सैदाणे, वदंना जयस्वाल, रेखाताई यांच्या वतीने हे निवेदन मा. श्री. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.