बहुजन पत्रकार संघाच्या राज्यअध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची बिनविरोध फेरनिवड

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.12फेब्रुवारी):-संपूर्ण राज्यातील बहुजन पत्रकारांच्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्या अखिल महाराष्ट्र पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या राज्य अध्यक्षपदी तिरंगा रक्षक आणि मानवाधिकार न्यूज वर्तमानपत्राचे मालक-संपादक विश्वास मोहिते यांची बिनविरोध निवडणूक करण्यात आली.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.गेली दोन वर्षे मोहिते हे राज्य अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. विविध पत्रकारावर झालेल्या अन्यायावेळी आक्रमक पणे त्यांनी आवाज उठवला होता.

तसेच राज्य शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती बाबत असणाऱ्या जाचक अटी विरोधातही शासनाकडे यापूर्वीही पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या पत्रकारांच्या प्रश्नांची असणारी जान आणि धावपळ पाहूनच पत्रकार बंधवांनी ही बिनविरोध निवड केली आहे. यावेळी विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात बैठक झाल्यामुळे अक्कलकोट तालुका अध्यक्ष म्हणून तिरंगा रक्षक चे तालुका प्रतिनिधी मोहन सुतार यांची निवड करण्यात आली. यावेळी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे,औरंगाबाद, बीड, लातूर सह राज्यातून बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.